Thursday, March 25, 2010

बापट

बापट .वय फ़क्त ८४ .मूळ कोक्णाताले .पण गेली ७ पीढया पुण्यातच राहीलेले .पूर्वज पेशव्यांच्या दरबराताले .ब्राह्मन असल्याचा ,R.S.S.चे असल्याचा अभीमान .अहंकार नसावा .(बोलताना तस जाणवल नाही ) रोज संध्याकाळी बालगंधर्व (कार्यक्रम free असेल तर ), पेठांमधिल देवळ ,व्याख्यानमाला , कलाप्रदर्शन जीथ म्हणून वेळ घालवता येइल , तीथ हजेरी .रोज सकाळी योगासन करत असल्यान तब्येत उत्तम.गुहेत फ़क्त ३ दात असेल तरी बोलण्याची हौस दांडगी .जमेल तशी समज्सेवाही करतात .कोणाला जेवायला घाल ,कोणाच्या शालेची फी भर असल काही काही .बापटांच देशावर प्रेम आहे . देशासमोर्च्या प्रश्नांनी त्यांनाही अस्वस्थ केलय .पण ‘बापट ’ असल्यान ती अस्वस्थता उपरोधीक आहे .या देश प्रश्नांवर कधी काली कामही केल असेल .कारन काय केल्यान काय होइल याची त्यांना जाणीव आहे .सध्या नीदान इतरांना त्या प्रश्नांची ओळख तरी करून देत हो ते .जवळ जवळ पौन तास बोलून बपतान्नी अचानक वीशयच बदलला .होणारी तगमग सहन होत नव्हती , म्हणून असेल ।थोड्या वेळान माझा इतका वेळ घेतल्या बद्दल माझी माफ़ी मागुन (का मला लाजवुन ?)बापट नीघून गेले .

एवढा वेळ बोलूनही बापट हा मानुस काही कल्ला नाही .कदाचित माझी समजण्याची ताकदाच कमी असेल .बाकी वर्षानुवर्षे बरोबर राहून आपल्याला जव्ळची मानस समजत नाहीत .त्यांच्यावर एका वीशीष्ट स्वभावाचा शीक्का मारल्यावर त्यांच्या प्रत्येक कृतीकडे एकाच नजरेतून पाहून आपण आपलच कीती नुकसान करून घेतो ।इथ पौन -एक तासात काय मानुस कळनार ? आणी तसही ‘बापट ’लोक कलायला जरा अवघडच असतात .

No comments:

Post a Comment