Monday, March 1, 2010

एक होता देव ।त्यानी म्हणे सांगुन ठेवल होत की –

‘ मी चरचरात व्यापून उरलेलों आहे .माझी अनंत रुपे आहेत . मी सर्व शक्तिमान आहे . माज्या इतका भारी कोणीच नाही .इतर कोणत्याही देवाची पूजा केल्यास ती मलाच पावते .आम्ही सर्व देव एकच आहोत . पण तू फ़क्त मलाच शरण जा . जो मला जाणत नाही अथवा मानत नाही त्याला पुढील अनंत जन्म नरक यातना भोगाव्या लागतील . माज्या भक्तांवर कही संकट आली तर ती मी त्यांची घेतलेली परीक्षा आहे आणी इतर कोणावर संकट आली तर तो माझा कोप असतो . फ़क्त मी आणी मीच तुम्हाला मुक्ती देऊ शकतो । माज्या दर्शनाला येताना रीक्त येऊ नका . मुळात मी नीरीछ आहे आणी मला अप्राप्य अस काही नाही . पण तुम्ही यथा शक्ती माज्या मंदीरान्ना दान दया . आधी माज्या भक्तांची बौद्धीक पातळी जास्त असल्यान मी त्यांच्या सुखात सुखी होतो . पण आता त्यांची आर्थीक पातळी वाढली , भयाची पातळी वाढली .त्यामुले माज्या सुखातच सुखी रहन्याचा आशीर्वाद मी त्यांना दीलाय . आज काल मी कर्मयोग वगैरे काही सांगत नाही .भरपूर पैशांच दान करून , एखादी महापूजा घालून , कींवा एखाद्या मुकया प्रान्याचा बळी देण्याची धमकी दीली की मी पटकन हात वरती करून मोक्ष देऊन टाकतो .

No comments:

Post a Comment