Sunday, March 21, 2010

दीर्घ श्वसन

कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन .

चला , नीट मांडी घालून बसा

हात समोर , डोळे मीटलेले

लकश फ़क्त खोल आत जाणार्या श्वासावर

हा आवाज कुठून येतोय ?

खाली मारामारी चाललीय का ?

बाईला मारतायेत बहुतेक

शु ………क

लकश कुठाय ? श्वासावर लकश .

कदाचित खाली जाऊन

बाईला मारनार्याचा हात धरता आला असता

पण कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन

टाकी बहुतेक overflow झालीय

जाऊ का machine बंद करायला ?

पण मग ते काम माझ्याकडेच लागेल

शीवाय स्गळयान्ना कधी कळणार

अमूल्य अशा त्या पान्याच महत्व

पानी अडवा ! पानी जीरवा !!

कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन .

मंदीरात्ला राम की हातातल काम ?

काय गरजेच आहे ?

वत्सा ! अरे कर्मयोग मी फ़क्त

अर्जुनाला चुच्कारान्यासाठी

सांगीतला होता !

तू भजे गोवींद

अन देतोय खावींद

श्वासावर लकश आहे ना ?

चालू दया !

Office मधे boss ओरडतो

मंदीरात भटजी ओरडतो

Police ओरडतो , भीकारी ओरडतो

Library मधल्या त्या शांत शांततेत

टेबला मागचा माणुस ओरडतो

यावेळेस अतीशय उपयुक्त असत

थोर अस ते दीर्घ श्वसन !

हा देह म्हणजे मी नाही

मी म्हणजे हा देह नाही

आयुश्यभ्राचे सगळे घाव

या देहावरच पडायला पाहीजेत

कारण देह तर बदलता येतो

आत्मा चीरंतन आहे

म्हणून या देहाला करू दया श्वसन

आत्म्याच चालू दया दीर्घ श्वसन

हं ! चला पटकन बसा

हात समोर , डोळे मीटलेले ……

2 comments: