Thursday, April 1, 2010

चांदणं

११ .३० वाजले असतील .आज फ़क्त ३ चांदण्या आणी चंद्र दीसत होता .तीनही चांदण्या चांगल्या मोठ्या होत्या.चंद्रप्रकशामुळं त्याच्या आजुबाजुला एकही चांदनी दीसत नव्हती .खुप वेळ त्या चौघांकड़ं पाहत होतो .आकाश भरलेल वाटत नव्हत .तस मला पूर्ण मोकळ आकाशही खुप आवडत .पण ते दीवासाचं .या क्शीतीजापासुन त्या क्शीतीजापर्यंत पूर्ण नीळ .तेंव्हा तीथ सुर्यही नको वाटतो .रात्री मात्र आकाश चंदंयानी पूर्ण भरलेलेच हव .म्हणजे ते असतच .हा वीचार मनात आला अन आधी मोकल्या दीसनार्या जागेकड़ टक लावून पाहू लागलो .गम्मत म्हणजे मला अनेक बारीक़ चांदण्या लुक्लुक्ताना दीसु लागल्या .सर्व मोकल्या जागी पाहू लागलो .आणी मग मोकली जागाच सापडेना .भास व्हावा त्याप्रमाण चांदण्या दिसयाच्या अन परत गायब .असा खेल होता तो .मला खर्च चांदण्या दिसताहेत का मला खर्च भास होतोय ,या फंदात मी पडलो नाही .मग चंद्राच्या आजुबाजुला पाहू लागलो .पण कही नाही दीसल. चंद्राचा उगाचच राग आला .अमावस्येला उरलेल्या चांदण्या पहायच ठरवल .बर झाल आपल्याला गुरु -शनी सारखे १० -१२ चंद्र नाहीत .म्हनुनच आपला चंद्र जरा महत्त्व टिकवून आहे .नाही तर आमवास्येची रात्र हा प्रकारच माहीत नसता .अडीच -तीनला परत जाग आली .मघाशी बाजूला असणारी लख्ख चांदनी आता डोक्यावर आली होती .चन्द्र प्रकाश दीसत होता .चंद्र दीसत नव्हता .खुप सरे ढग हळु हळु वहात होते .

आज खुप दीवासंनी मनमोकल आकाश पाहील .त्या नादात गाढ़ झोप येत नसल्यचाही काही वाटल नाही अन त्या अगणीत कुत्र्यांच अनंत कल भुन्कंयाचाही काही वाटल नाही .